पाचोर्‍यातील शिक्षक आबा पाटील यांना पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्याचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला

पाचोर्‍यातील शिक्षक आबा पाटील यांना पुरस्कार प्राप्त
महाराष्ट्र राज्याचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

पाचोरा ( प्रतिनिधी)
-जळगाव जिल्ह्यातील आठ संस्थान पैकी *केवलाई फाउंडेशन, पाचोरा* या संस्थेला पुरस्कार वितरित करण्यात आला.
जळगाव- दि.१३ मार्च २०२४-
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी वितरित करण्यात येतो. तरी या वर्षाचा 2022 23 या वर्षाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार पाचोरा येथील केवलाई फाउंडेशन, पाचोरा या संस्थेला वितरित करण्यात आला.
केवलाई फाउंडेशन चे कार्य सर्व जनसामान्यांपर्यंतची मदत व एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे संपर्क कामाची दखल घेऊन हा पुरस्कार केवलाई फाउंडेशन पाचोरा या संस्थेला जाहीर झाला होता या पुरस्काराचे वितरण दिनांक 12 मार्च 2024 रोजी एनसीपीए हॉल, मुंबई येथे वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमत्री अजित दादा पवार, मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्क्षतेखाली आमदार संजय सावकारे,सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे साहेब, श्री ओम प्रकाश बकोरिया(आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य) तसेच जळगाव जिल्ह्यचे सहाय्यक आयुक्त श्री योगेश पाटील साहेब यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री आबा पाटील सर व कार्याध्यक्ष अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.