श्री.गो .से हायस्कूल पाचोरा येथे शासकीय रेखाकला परीक्षा निकाल जाहीर

श्री.गो .से हायस्कूल पाचोरा येथे शासकीय रेखाकला परीक्षा निकाल जाहीर

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 2023 वर्षाचा शासकीय रेखाकला परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते कौतुक व गौरव करण्यात आला.
इलेमेंटरी परीक्षेत ‘अ’ श्रेणी मध्ये 24 विद्यार्थी पास झाले व इंटरमिजिएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले . नुकत्याच संपन्न झालेल्या अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यात विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना रेल्वे विभागातर्फे गौरवण्यात आले होते त्यांचेही कौतुक व सत्कार करण्यात आला.या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील भिवसणे, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व्हि.टी. जोशी, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए बी अहिरे, अंजली गोहिल, सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी, मनीष बाविस्कर, अजय सिनकर आकाश वाघ .उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोडिण्य व आभार रवींद्र बोरसे यांनी मांडले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.