चोपडा येथील दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

चोपडा येथील दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

चोपडा: येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३१ जानेवारी २०२४ रोजी *हॉर्टिकल्चर टेक्निक्स ॲन इंटरप्रीन्युअर शीप ॲप्रोच* या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मध्यप्रदेश व महाराष्ट्र येथून बहुसंख्येने विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील ह्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथील प्रा. डॉ. एस. डी.पाटील, प्रा.डॉ.आर.व्ही.पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्र पाल येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.डी.एस.नेहेते, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगाव येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.नितीन पाटील तसेच प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार डी.एम. पाटील व कार्यशाळेचे संयोजक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.आर एम बागुल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन क.ब.चौ उमवि चे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.एल पी.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक चर्चासत्राचे संयोजक प्रा. डॉ.आर एम बागुल यांनी केले.
या कार्यशाळेसाठी तज्ञ साधन व्यक्ती म्हणून शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथील प्रा. डॉ. एस. डी.पाटील व प्रा.डॉ.आर.व्ही.पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्र पाल येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.डी.एस.नेहेते यांचे सह जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगाव येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.नितीन पाटील हे मार्गदर्शक म्हणून लाभले.
या कार्यशाळेत हायटेक हॉर्टिकल्चर ॲंड इंटरप्रीनीयरशीप अपॉरच्यूनीटीज, कमर्शियल हॉर्टिकल्चर आणि व्यवसायिक संधी, प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल प्लांट्स इत्यादि विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ.एस.डी.नेहेते यांनी हँड्स ऑन ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून संबंधित विविध प्रकारचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील करून दाखविले. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव येथील डॉ.नितीन पाटील यांनी पोस्ट हार्वेस्टिंग डइसईजएस मॅनेजमेंट या विषयावर सादरीकरण केले.
या कार्यशाळेचे उदघाटक क.ब.चौ उमवि चे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.एल पी.देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करतांना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंतर्गत पारंपारिक अभ्यासक्रम आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रम यांची सांगड योग्य रीतीने साधण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना निश्चित होईल’ असे प्रतिपादन करून आयोजकांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे प्रतिक्रिया नोंदवताना सदर राष्ट्रीय कार्यशाळा उत्कृष्ट बौद्धिक मेजवानी ठरली असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘सध्या शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सजग राहून विविध प्रकारचे विषय शिकण्याची संधी प्राप्त करून घ्यावी’ असे मत मांडले.
या कार्यशाळेचे डॉ.प्रदीप सौदागर व डॉ. जितेंद्र पाटील यांनी सेशन कोऑर्डीनेटर म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस. पाटील, एस बी पाटील व डॉ.एल बी पटले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.एच.जी. सदाफुले यांनी केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी लाईफ सायन्सेस विभागातील शिक्षक वृंद वैशाली सोनगीरे, भावना पाटील, व्ही.के. पटेल तसेच शिक्षकेतर कर्मचारी लॅब असिस्टंट महेंद्र क्षीरसागर, प्रतिभा पाटील,रविंद्र पाटील, राजु निकम, योगेश पाटील, रिसर्च स्कॉलर देवेंद्र माळी,सागर सोनवणे, अनंतकुमार पवार व रमणलाल पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.