पुनगाव रोड येथील गजानन महाराज मंदिरात ७ तासांत साकारलेली भव्य रांगोळी

पुनगाव रोड येथील गजानन महाराज मंदिरात ७ तासांत साकारलेली भव्य रांगोळी

पाचोरा | प्रतिनिधी
पुनगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात १४८ व्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावपूर्ण रांगोळी सेवेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ७ तासांच्या अथक परिश्रमातून ही आकर्षक, भावस्पर्शी व भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
या रांगोळीतून श्री गजानन महाराजांचे दिव्य रूप, त्यांचे तत्त्वज्ञान व भक्तीचा संदेश अत्यंत सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आला आहे. ही अप्रतिम रांगोळी सेवा कलाकार शैलेश कुलकर्णी, सत्यजीत पाटील, ओमकार केंडले, ओम् पाटील, देवांगिनी मोकाशी व अमन कुमार यांनी संयुक्तपणे साकारली आहे.
भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ही रांगोळी मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलवणारी ठरत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून रांगोळीचे विशेष कौतुक केले जात आहे.
ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी व नागरिकांनी पुनगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.