लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करताना निवडणूक प्रचारास सक्त मनाई, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संचार बंदीचे (१४४) कलम जारी

लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करताना निवडणूक प्रचारास सक्त मनाई, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संचार बंदीचे (१४४) कलम जारी

 

(‌सुनिल नजन”चिफ ब्युरो”तथा स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा ) ‌‌ ‌संपुर्ण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशनपत्राचे अर्ज दाखल करताना निवडणूक प्रचारास सक्त मनाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संचार बंदीचे १४४कलम जारी करण्यात आले आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांसाठी आदेश दिले आहेत की लोकसभेच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राचे अर्ज दाखल करताना निवडणूक प्रचारास सक्त मनाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आदर्श आचार संहितेचा भंग होउनये म्हणून संचारबंदीचे १४४ कलम जारी करण्यात आले आहे.लोकसभेच्या निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निवडणूक प्रचारास सक्त मनाई करण्यात आली आहे.फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी हे आदेश जारी केले आहेत.अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय, आणि न्याय पद्धतीने शुद्ध वातावरणात पार पडावी म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे आदेश दिले गेले आहेत.निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राचे अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालन परीसरात सक्तीने हे कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना तिनं पेक्षा जास्त मोटार वाहनांचा ताफ्यात समावेश नसावा.तसेच अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात आणि दालनात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.तसेच कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक काढणे, जाहीर सभा घेणे, कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करणे,वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे या आणि इतर कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारास प्रतिबंध करण्यात आला आहे.तसेच निवडणूक काळात शस्त्रबंदीही करण्यात आली आहे.कोणत्याही प्रकारचे शस्त्र,हत्यार, हातात बाळगता येणार नाही.लोकसभेची निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय पध्दतीने आणि शुद्ध वातावरणात पार पाडणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र जवळ न बाळगण्याचे प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील महसूल स्थळांच्या सीमेतील हद्दीत कोणत्याही इसमास निवडणूक काळात शस्त्र परवाण्यातील शस्त्रे जवळ बाळगून सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.निवडनूक काळात या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या विरोधात प्रतिबंधात्मक व दंडात्मक स्वरूपात कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पारीत केले आहेत .