पाचोरा तालुकास्तरीय शालेय १४, १७ व १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांची बुद्धीबळ स्पर्धा संपन्न
शहर प्रतिनिधी / पाचोरा
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा व पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटना संयुक्त विद्यमाने आयोजित १४, १७ व १९ वर्षाखालील मुला मुलींची बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात
रोहित बालपांडे (प्रथम), गौतम जैन (द्वितीय), राज पाटील (तृतीय), युग पुर्सनाणी (चतुर्थ), पियुष कुमावत (पाचवा), मुलींच्या गटात
स्वरा वाघ (प्रथम), उत्कर्ष सूर्यवंशी (द्वितीय), लिशा जैन (तृतीय), खुशी लोखंडे (चतुर्थ), अनुष्का सोनवणे (पाचवा क्रमांक)
१७ वर्षाखालील गटात (मुले) स्वरित पाटील (प्रथम), प्रणय शहा (द्वितीय), अनय पाटील (तृतीय), शाश्वत संघवी (चतुर्थ), सिद्धेश पाटील (पाचवा क्रमांक)
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात
श्रावणी अलाहित (प्रथम), ऋतुजा बालपांडे (द्वितीय), श्रेया महालपुरे (तृतीय), निशा चौधरी (चतुर्थ),
रुचिका वाधवणी (पाचवा क्रमांक)
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात
आदित्य सुरवाडे (प्रथम), चेतन पाटील (द्वितीय), मयूर पाटील (तृतीय), तन्मय नागराणी (चतुर्थ), सुजल राजपूत (पाचवा क्रमांक)
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात
इशा राठोड (प्रथम), हर्षिता कुकरेजा (द्वितीय), नंदिनी पाटील (तृतीय), अनुष्का चव्हाण (चतुर्थ), विद्या परदेशी (पाचवा क्रमांक) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे सर्व पदाधिकारी तसेच क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, महेश चिंचोले, संदीप मनोरे यांचे सहकार्य लाभले