“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव

“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव

पाचोरा – चारुदत्त सुदाम पाटील, रा. परधाडे, ता. पाचोरा ह.मु.महाबळ कॉलनी जळगाव, यांची नुकतीच आपल्या भारतीय सैन्य दलात “लेफ्टनंट कर्नल” पदावर बढती मिळाल्याबद्दल लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला लेफ्टनंट कर्नल” चारुदत्त पाटील यांच्या संदर्भात कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढीच प्रेरणादायी आहे त्यांचे आजोबा परधाडे येथील रहीवाशी चिंधु झेंडू पाटील हे प्रगतीशिल शेतकरी जरी होते तरी देखील त्यांचा जिवन प्रवास तेवढाच महत्वाचा होता जुनी सातवी म्हणजे त्यावेळेची फायनल हे शिक्षण त्यावेळी देखील नेत्रदिप होते अशा शिक्षणामुळे त्यांच्या आजोबांना 1947 साली स्वतःहुन हवलदाराची नोकरीची संधी मिळाली परंतु त्यांनी ती नाकारत गिरणामाईच्या कुशीत राहूनच शेती करणे पसंत केले. अशा आदर्श शेतकऱ्यांचा वारस लाभलेल्या परिवारात श्री. सुरेश चिंधु पाटील व श्री. सुदाम चिंधु पाटील या दोघं पुत्रांनी जि.प. मराठी शाळेत शिक्षण घेऊन दोघंही पुत्रांनी आपल्या जिवनाची वाटचाल जनसेवा व समाजहिताचाच मार्ग निवडला यात सु.ची पाटील हे विद्यादानाचे काम करीत पिंपळगाव हरे.येथे शिक्षक म्हणुन सेवा निवृत्त झाले तर “लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त यांच्या वडीलांनी देखील M.sc (Agri) उच्च शिक्षण घेऊन शेतकऱ्यांच्या सेवेचा मार्ग स्विकारला नव्हेतर राहुरीकृषी विद्यापिठात वर्ग-१ च्या विविध पदांवर कार्यरत असतांना त्यांनी डॉक्टरेक्ट (PhD ) पदवी प्राप्त केली याचाच परिपाक म्हणजे डॉ. सुदाम पाटील यांना भारत सरकारच्या वतीने 1995 मध्ये UK तर 1998 मध्ये कॅनडा येथे जाण्याची संधी प्राप्त झाली. एवढी गगन भरारी घेऊन सुद्धा त्यांनी मातीशी नाळ जुळलेली कायम ठेवत आपल्या जन्मभुमीतील बळीराजाचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ऋ्ण फेडण्याची संधी मिळाली आणि ते जळगाव येथे राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणुन नियुक्त झाले सोबतच त्यांना मुक्ताईनगर कृषी कॉलेजेचे प्राचार्य म्हणुन जादाचा पदभार देण्यात आला अशी सेवा बाजावत असतांना जळगाव येथेच ते सेवा निवृत्त झाले
“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त यांची पदोन्नती प्रसंगी या लेखाजोख्यात त्यांचे वडील डॉ.श्री. सुदाम पाटील & काका श्री.सु ची पाटील यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्याचे कारण म्हणजे त्यांचे आजोबा शेतकरी त्यांच्या दोघही पुत्रांनी जनहित व सेवेचे सेवानिवृत्ती पर्यंत काम करीत असतांना प्रत्येकाच्या दुवा घेतल्या गरजुंचे आशिर्वाद घेतले आणि याच दुवा – आर्शिवाद कामी येत “लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त यांचे काकाश्री चे सुपुत्र मेजर विनय सुरेश पाटील हे देखील आज भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या एकाच गावातील एकाच घरातील भारतीय सैन्यदलात दोघं चुलत भाऊ अतीउच्च पदावर कार्यरत आहेत ही समस्त गुर्जर समाज, गांव, तालुकाच नाहीतर पंचक्रोशिसाठी गर्वाची बाब आहे.”लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ते २००६ ते २००९ या कालावधीत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला पुणे, या लष्करी प्रशिक्षणातील नामांकित अशा संस्थेत त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले.
पुढे २०१० मध्ये डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी मधून आपले प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
ते २०१२ पर्यंत अमृतसर येथे सैन्य दलात तैनात होते, त्याचवेळी त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळून २०१३ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग या लष्करी तळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
२०१६ मध्ये त्यांनी लष्कर व सैन्य दलातील नवनवीन व आधुनिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन, स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली, नाशिक, येथे एक वर्षाचा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे त्यांची लष्करात मेजर म्हणून पदोन्नती करण्यात आली.
२०१७ ते २०१९ पर्यंत त्यांना पुन्हा अरुणाचल प्रदेशातील तुटिंग येथे भारताच्या पूर्वेकडील सीमा भागात तैनात करण्यात आले.
“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांनी निवडलेले क्षेत्र आणि त्यांच्या या कठोर निर्णयाला त्यांच्या माता – पिता यांनी मनावर दगड ठेवून दिलेली साथ, समाजासाठी “एकमेकाद्वितीय” अशीच गौरवास्पद बाब निश्चितच आहे. आणि यामुळे भविष्यात विद्यार्थी आणि पालक यांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार समन्वयाने घेतलेल्या निर्णयाचा भविष्यकालीन परिणाम किती महत्त्वाचा ठरतो, हेच अधोरेखित होते. समाज बांधव व विद्यार्थी या पुढे श्री. चारुदत्त पाटील यांचा आदर्श समोर ठेवून या गोष्टीचा नक्कीच विचार करून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील हीच अपेक्षा.
२०२१ मध्ये भारतीय लष्करातील अजून आपले पुढील शैक्षणिक ध्येय पूर्ण करण्यासाठी पुणे येथे स्टाफ कोर्स अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे लष्करातील स्टाफ नियुक्ती मंडळावर हैदराबाद येथे त्यांना नियुक्त केले गेले.
“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त शैक्षणिक कारकीर्द आणि लष्करातील धीरोदात्त आणि अतुलनीय अशा पराक्रमामुळेच भारतीय लष्करात त्यांना “लेफ्टनंट कर्नल” या उच्च आणि मानाच्या पदावर आज नियुक्ती मिळाली आहे
“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त चारुदत्त पाटील यांचे वडील श्री. सुदाम चिंधू पाटील व आई सौ. भारती सुदाम पाटील व बंधू श्री.अनंत पाटील, यांनी आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन आपल्या मुलास लष्करात भरती होण्यासाठी दिलेले प्रोत्साहन व संमती त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सौ.कल्याणी चारुदत्त पाटील यांनी मोलाची साथ दिल्यामुळेच ते लष्करातील आपला खडतर प्रवास सहज पूर्ण करून आपल्या शिरपेचात एकेक मानाचा तुरा रोवत आहेत.
त्यांच्या कर्तबगारी बद्दल समाजातील तसेच जिल्ह्यातील सर्व थरातून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गत शूरवीर गुर्जर सम्राटांनी देश रक्षणार्थ केलेल्या महान कार्याला “लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त पाटील यांनी एक प्रकारे मानाचा मुजरा केला आहे. भविष्यात सुद्धा देश रक्षणार्थ त्यांनी भारतीय लष्करात खूप मोठी भरारी घेऊन, त्यांचे हातून मोठी देश सेवा घडावी व समाजाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे, यासाठी त्यांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा.
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले “लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त & मेजर विनय या दोघंही बंधुची सोईची एकत्रित दिनांक व वेळ घेऊन स्वातंत्र सैनिक स्व. आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पाचोरा शहरात माता-पित्यांसह नागरी सत्कार करण्यात येणार आहे