कै.पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालय,पाचोरा येथे व्यवसाय मार्गदर्शन दिवस साजरा

आज कै.पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालय,पाचोरा येथे व्यवसाय मार्गदर्शन दिवस साजरा…

पाचोरा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार

आज कै.पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालय,पाचोरा येथे *व्यवसाय मार्गदर्शन दिवस* साजरा करण्यात आला कार्यक्रfमाच्या अध्यक्षस्थानी मा.गिरीश जगताप साहेब (गटशिक्षणाधिकारी, पं.स.पाचोरा) होते.तर प्रमुख अतिथी म्हणून अण्णासाहेब समाधान पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.पाचोरा) कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अतुल शिरसमणी सर (संचालक,आशीर्वाद कम्प्युटर्स,पाचोरा) होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.व्ही.गीते सर यांनी केले,तर सूत्रसंचालन डी.आर.कोतकर सर यांनी केले.
दहावीनंतर पुढे काय.? या विषयावर अतुल सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दहावीनंतर आय.टी.आय., पॉलीटेक्निक, कॉलेजला आर्ट,कॉमर्स व सायन्स अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. तसेच किमान कौशल्य त्यासाठी आपल्याला पुढे कोणत्या क्षेत्रात पाऊल टाकायचे आहे ते आपण अगोदरच ठरवले पाहिजे. आणि त्यानुसार आपण, आपला अभ्यास केला म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचता येईल असेही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले. अध्यक्षीय भाषणात मा.गिरीश जगताप साहेब यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपला कल कोणत्या दिशेला आहे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे.हे आतापासूनच ठरवावे व त्यासाठी आपण कसा ? व किती वेळ? अभ्यास केला पाहिजे. हे देखील ठरवावे,म्हणजे यश निश्चितच मिळेल.असे ही शेवटी ते आपल्या भाषणात म्हणाले. सदर कार्यक्रमास 175 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार प्रदर्शन आर.बी.धोबी सर यांनी केले.