श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा. येथील विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा 2025 च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पाचोरा( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा. येथील विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला चित्रकला ग्रेड परीक्षा2025 एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इलेमेंटरी ‘अ’ श्रेणीत 11 विद्यार्थी ‘ब’श्रेणीत 20 विद्यार्थी पास शेकडा निकाल 98% तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत’अ’ श्रेणीत 15 विद्यार्थी ब श्रेणीत 25 विद्यार्थी उत्तीर्ण शेकडा निकाल 97% लागला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख,मुख्याध्यापक एन.आर.पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी, आर.बी. बांठीया,पी.एम. पाटील, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, क्रीडाशिक्षक संजय करंदे ,श्रीकांत अहिरे उपस्थित होते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाचे सर्वत्र विद्यार्थ्यांची कौतुक होत आहे.

























