रोहित पवार यांच्या वर गोळीबार करणारऱ्या तिन आरोपींच्या गावठी कट्टयासह स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील कान्होपात्रा नगरातील बीड रोडवर असलेल्या “हाॅटेल न्यु कावेरी” चे मालक रोहित पवार यांच्या वर गोळीबार करणारऱ्या तिन आरोपींच्या जिल्हा गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.या बाबदची माहिती अशी की 18/12/2025 रोजी फिर्यादी श्री.रोहित अनिल पवार रा.संतकान्होपात्रा नगर जामखेड, ता.जामखेड, जिल्हा अहिल्यानगर हे त्यांच्या जामखेड-बिड रोडवर असलेल्या हॉटेल न्यु कावेरी, या ठिकाणी बसलेले असतांना त्यांच्या हॉटेलसमोर येऊन तिन आरोपींनी त्यांच्या जवळील गावठी कट्टा काढुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या दिशेने गोळीबार करुन फिर्यादी रोहित पवार यांना दुखापत केली आहे. सदर घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2),191 (2), 190, 324(5), 351(2)(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी,यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना त्वरित ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार अतुल लोटके, शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ,मनोज साखरे,सागर ससाणे,योगेश कर्डीले,प्रशांत राठोड,महादेव भांड,चंद्रकांत कुसळकर यांचे एक तपास पथक तयार करुन सदर पथकास आरोपीचा शोध घेवुन आरोपीस त्वरित ताब्यात घेण्याबाबत सुचना देऊन तपासासाठी पाठवून दिले. तपासासाठी
नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाने दिनांक 18/12/2025 रोजी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता त्यांना गुन्ह्यातील आरोपी उल्हास माने हा जामखेड रोड,आष्टी परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जावुन पोलीसांनी आरोपीचा शोध घेतला असता हॉटेल साईराज समोर गुन्ह्यातील आरोपी मिळुन आला. पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव उल्हास उर्फ वस्ताद विलास माने,(वय 49 वर्षे), राहणार तपनेश्वर गल्ली,जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे सांगितले होते. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारां सोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्यानंतर दुसऱ्या आरोपींचा शोध घेत असतांना दिनांक 19/12/2025 रोजी शुभम लोखंडे व बालाजी साप्ते हे वाळुंज गांवच्या शिवारात अहिल्यानगर ते सोलापुर कडे जाणाऱ्या रोडवरील “हॉटेल शाम” जवळच्या परिसरामध्ये आले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे दोन इसम संशयित रित्या फिरताना आढळून आले. मग त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) शुभम शहाराम लोखंडे (वय 26 वर्षे), राहणार आष्टी कमान वेशीसमोर, ता. आष्टी, जिल्हा बीड, 2) बालाजी शिवाजी साप्ते (वय 27 वर्षे),राहणार तेली गल्ली,पांढरे मेडिकलच्या पाठीमागे,आष्टी, ता. आष्टी, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले.
वरील ताब्यातील आरोपी जवळून गुन्ह्यामध्ये वापरलेला 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा, 20,000/- रुपये किंमतीचा फिर्यादीचा काढुन नेलेला सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचा डी.व्ही.आर. असा एकुण 50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींना जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191 (2), 190, 324(5), 351(2)(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्ह्यांच्या तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक करीत आहे.
सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस पथकाने केली आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचा अजूनही कोण कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग आहे याची पोलिसा कडून कसुन चौकशी सुरू आहे.

























