चोपडा महाविद्यालयात सायबर क्राइम व डिजिटल फसवणुकीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आत्मनिर्भर युवती अभियान दिनांक २ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सध्याच्या डिजिटल युगात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यान मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन सोनवणे उपस्थित होते. यावेळी व्याख्याते सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे व पोलीस नाईक (PN), संदीप नन्नवरे, प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. आर. एम.बागुल, समन्वयक डॉ. एस.ए. वाघ, युवतीसभा प्रमुख डॉ. सौ. प्रीती रावतोळे व डॉ. क्रांती क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांनी सायबर क्राइम म्हणजे नेमके काय, तसेच कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे त्यात समाविष्ट होतात याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पोलीस नाईक (PN) मा. श्री. संदीप नन्नवरे, ग्रामीण पोलीस स्टेशन, चोपडा यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर आणि डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. सार्वजनिक किंवा फ्री वायफायचा वापर टाळावा, कारण त्याद्वारे बँकिंग संबंधित गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असते. कोणतीही ऑनलाइन सेवा वापरताना वेबसाईट ओरिजनल आहे की नाही याची खात्री करावी. अनोळखी स्त्रोतांकडून येणारे कंटेंट, लिंक किंवा एपीके फाईल्स डाउनलोड करू नयेत. फेक सोशल मीडिया आयडी तयार करणे किंवा संशयास्पद साइटवर कमेंट करताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या सोशल मीडिया खात्यांवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन करावे, असेही आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
या प्रसंगी समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची उदाहरणे देत स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. सायबर गुन्ह्यांच्या प्रसंगी घाबरून न जाता शांतता आणि समयसूचकता राखणे किती महत्त्वाचे आहे, तसेच अशा परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. प्रीती रावतोळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले तर आभार सौ. पूजा पुन्नासे यांनी मानले. याप्रसंगी बँक सहायक राकेश सुधाकर चौधरी तसेच मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सौ. सुनिता पाटील, डॉ. संगीता पाटील, सौ. हर्षा देवरे, सौ. पूजा पुन्नासे, दर्शन पाटील, धनंजय चौधरी, निलेश भाट, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान रजिस्ट्रार डी. एम पाटील, जुनिअर विभागाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, डॉ. सी. आर.देवरे, डॉ. अभिजित साळुंखे, . चेतन बाविस्कर, दिपक करंकाळ, सौ. विशाखा देसले, सौ. सुनंदा नन्नवरे व जी. एम. राठोड यांचे सहकार्य लाभले

















