शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव येथे
तासिका तत्त्वावरील (CHB) रिक्त पदांसाठी मुलाखत व चाचणी परीक्षा
जळगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव येथे तासिका तत्त्वावरील (Clock Hour Basis – CHB) रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेचे प्राचार्य श्री. योगेश कुलकर्णी यांनी या पदांसाठी पात्र उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
संस्थेमध्ये यांत्रिक डिझेल (02), तारतंत्री (01), विजतंत्री (01), वेल्डर (01) व साचेकर (01) अशा एकूण 06 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सदर पदांसाठी मुलाखत व चाचणी परीक्षा मंगळवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
उमेदवारांकडे संबंधित व्यवसायातील ITI / Diploma / Degree ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असून अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचे दाखले, आधार कार्ड तसेच त्याच्या साक्षांकित छायांकित प्रतींचा संच सोबत आणणे बंधनकारक आहे.
निवड प्रक्रिया ही प्रात्यक्षिक / लेखी चाचणी परीक्षा व मुलाखत यांच्या आधारे करण्यात येणार आहे.
टीप : सदर पदे ही पूर्णपणे तासिका तत्त्वावर (CHB) असून तात्पुरत्या स्वरूपाची आहेत.
—
प्राचार्य
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव
















