श्री .गो.से .हायस्कूल पाचोरा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

श्री .गो.से .हायस्कूल पाचोरा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री .गो.से .हायस्कूल पाचोरा. येथे महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले. उपमुख्यद्यापक एन .आर. पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहिल, संगीता पाटील, प्रीतम सिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून आपले मनोगत व्यक्त केले शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात समर्थ बडगुजर, मानसी चौधरी, दिव्यांशा सावलिया ,स्तवन भट, मानसी बारी ,कल्याणी महाजन, अशा अनेक विद्यार्थ्यांनी गुरुविषयी समर्पक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षस्थानी गुरुवर्यांविषयी विद्यार्थ्यांनी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन रवींद्र बोरसे. यांनी केले तर आभार अरुण कुमावत. यांनी मांडले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .