सेतू चालकाच्या गलथान कारभारामुळे महाडीबीटी घोटाळा,दिव्यांग व्यक्तीवर अंन्याय,सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे तक्रारी दाखल?

सेतू चालकाच्या गलथान कारभारामुळे महाडीबीटी घोटाळा,दिव्यांग व्यक्तीवर अंन्याय,सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे तक्रारी दाखल?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेवगाव, पाथर्डी,नेवासा,राहुरी, तालुक्यातील काही सेतू चालक हे शेतकऱ्यांचे महाडीबीटीचे ऑनलाईन अर्ज दाखल करताना अर्जातील रकान्यात अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरताना जसे जात श्रेणी,आणि अपंगत्व वर्गवारी,ही माहिती न भरता अर्धवट अर्ज दाखल करून शेतकऱ्यावर फार मोठा अंन्याय करीत आहेत. असाच एक प्रकार मीरी तालुका पाथर्डी येथील राजेंद्र गणपत तागड या दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे. त्यांचा महाडीबीटीचा ऑनलाईन फार्मर आयडी नंबर 86415404465 हा अर्ज भरताना अर्जात जात श्रेणी आणि अपंगत्व हे रकाने भरताना त्या मध्ये कोणतीही माहिती न भरता ते रकाने तसेच कोरे ठेवले होते.राजेंद्र गणपत तागड हे दिव्यांग आहेत.त्यांच्याकडे जिल्हा सिव्हिल सरकारी हॉस्पिटलचे ud id mh 2610619720367890 या क्रमांकाचे दिनांक 2/6/2023 रोजी इश्यू झालेले 42% दिव्यांग असलेले प्रमाणपत्र आहे.या शेतकरी महाडीबीटी घोटाळा दुरुस्ती साठी तागड हे पाथर्डीच्या गाडगे महाराज आमराईत तालुका क्रुषी अधिकारी कार्यालयाकडे गेले असता त्यांनी ही चुक मान्य केली परंतु हे चुका दुरूस्तीचे अधिकार हे क्रुषी राज्य आयुक्तांकडे आहेत अशी लेखी माहिती दिली आहे.मग तागड यांनी महाडीबीटी पोर्टल वर तिकीट नंबर 20250626194733या क्रमांकाने तक्रार नोंदवून राज्याचे विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे संबंधीत सर्व कागदपत्रे जोडून लेखी तक्रार दाखल केला आहे.जिल्ह्यातील काही सेतु चालक हे शेतकऱ्याकडून अव्वाची सव्वा पैसे घेऊन जाणून बुजून शेतकऱ्यांची लुट करीत आहेत असे तक्रार अर्जात नमूद केले आहे.नियमापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या सेतु चालकाचे परवाने रद्द करण्याची मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.सभापती साहेब आणि नामदार पालकमंत्री साहेब या बाबत नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.