पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा

पाचोरा येथे आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळ सत्रात शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी शिक्षक बंधू-भगिनींनी शालेय कामकाज केले त्यानंतर स्वागत समारंभ आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ यांनी भूषविले सूत्रसंचालन सौ एस एस महाजन यांनी केले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धा या स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आर बी बोरसे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात सौ श्रद्धा पवार मॅडम यांनी ईश्वराच्या आराधनेने केली त्यांना श्री थोरात सर आणि श्री रुपेश पाटील सर यांनी तबला व हार्मोनियमची साथ दिली नंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री एस एल वाघ सरांनी मनोगत व्यक्त सौ प्रमिलाताई वाघ यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव कमवा यशस्वी व्हा नंतर आभार प्रदर्शन श्री जाधव सर यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सौ ए आर गोहिल सौ एस एस पाटील श्रीमती सी बी सूर्यवंशी श्री पीएम पाटील श्री बाविस्कर श्री अजय सिनकर सौ एस व्ही साळुंखे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले