पाचोरा येथे गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे क्रिडा महोत्सव व बक्षीस वितरण कार्यक्रम

मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी, सुदृढ शरीरासाठी व संघ भावना निर्मितीसाठी विद्यार्थी जीवनात खेळांचे विशिष्ट महत्व असते. ही बाब लक्षात घेऊन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यात नर्सरी ते 12 वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागासाठी संधी दिली गेली. काही विद्यार्थ्यांनी चेस, कॅरम, रायफल शूटिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या इनडोअर स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला. तर काही विद्यार्थ्यांनी खो खो , कब्बडी, लेमन स्पून, रनिंग , व्हॉली बॉल, बास्केट बॉल सारख्या आऊट डोअर क्रिडामध्ये आपला सहभाग नोंदविला. या शिवाय पालकांनीही क्रिडा स्पर्धान्मध्ये भाग घेऊन बक्षिसे व आपल्या पाल्याचे मन जिकलित.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनाणी सर यांनी नाणेफेक करून व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून केले. क्रिडा स्पर्धेत विजयी व उप विजेत्या विद्यार्थ्याना शाळेतील शिक्षकवृंद, क्रिडा शिक्षक, मुख्याध्यापिका व प्राचार्य यांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.