पाचोऱ्या तालुक्यातील एक अनोखा विावाहसोहळा पाहायला मिळाला

परधाडे : दि 5 मार्च रोजी अनोखा विावाहसोहळा पाहायला मिळाला. या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे, यामधील विक्रम व राजश्री हे दोघं वधू-वर हे दृष्टीहिन आणि दिव्यांग होते. यामुळेच हा विवाहसोहळा या भागातील सर्वांसाठी विशेष ठरला. या लग्न सोहळ्यावेळी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवीत अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी वधू-वरांचे दृष्टीहिन आणि दिव्यांग बांधवांनीही यावेळी उपस्थिती लावली होती.
नशिबाने आयुष्यात अंध:कार भरला असला तरी जिद्दीने आयुष्यात ते यशस्वी झाले. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

पुणे येथील विक्रम या दृष्टीहिन तरुणाचा विवाह परधाडे येथील राजश्री या दृष्टीहिन तरुणीशी झाला. विक्रम हा एम. ए. झाला असून युनियन बँकेत कार्यरत आहे. राजश्री ही पण एम ए झाली असून ती स्टेट बँकेत कार्यरत आहे.