संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात पर्यटन क्लबचे उद्घाटन
सोयगाव : येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 15 नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यटन क्लबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण परिहार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयांमध्ये पर्यटन क्लबचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित डॉ. श्रीकृष्ण परीहार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पर्यटन क्लब संदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी पर्यटनातील विविध संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवाजी अंभोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश गावडे, डॉ.सुनील चौधरे, डॉ. पंकज गावीत महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश गावडे, डॉ. पंकज गावित, डॉ. सुनील चौधरे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

























