श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” हे महानाट्य यशस्वी झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा गौरव

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” हे महानाट्य यशस्वी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे गौरव करण्यात आला

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी “सुवर्णयोग माझ्या शिवबाचे “या महानाट्याच्या आयोजन करण्यात आले होते तब्बल 175 कलाकारांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सव्वा तासभर चाललेल्या या महानाट्यात रसिकांची मने जिंकून घेतली नाटिका संपन्न झाल्यावर संपूर्ण प्रसारमाध्यम, युट्युब ,व्हाट्सअप, फेसबुक यावर प्रसारण झाल्याने सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव झाला भविष्य असे नाटक पाचोरा चा इतिहास रचले गेले याचा सार्थ अभिमान पाचोरांना झाला म्हणून संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले . या महानाट्यासाठी ज्यांची मूळ संकल्पना होती ते संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी आपल्या मनोगतात पालक व विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले विद्यार्थ्यांनी केलेली कला रसिकांना भावली असून विद्यार्थ्यांकडून भविष्यात अपेक्षा व्यक्त केल्या व त्यांचा गौरव केला आमची संस्था ही अशा विविध चांगल्या कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहित करत असते याबद्दल त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले. महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन शाळेतील शिक्षक महेश कोंडिण्य यांचे विशेष कौतुक करत सत्कार करण्यात आला. या महानाट्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचाही गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व्हीं टी. जोशी, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन , उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए बी अहिरे, अंजली गोहिल, ज्येष्ठ लिपिक अजय सिनकर तांत्रिक विभाग प्रमुख मनीष बाविस्कर , आकाश वाघ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कोंडीण्य यांनी तर आभार आर.बी. बोरसे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.