गो.से.हायस्कूलचा शिक्षकांसाठी अनोखा उपक्रम “शिक्षकांची धमाल..मजा..मस्ती”

गो.से.हायस्कूलचा शिक्षकांसाठी अनोखा उपक्रम “शिक्षकांची धमाल..मजा..मस्ती”

पाचोरा -कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहली किंवा विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आणि विद्यार्थ्यांनी केलेली धमाल मस्ती या नियमित येणारा अनुभव परंतु पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो.से.हायस्कूलनं केवळ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करत एक अनोखा उपक्रम राबवला.

दीपावली सुटीनंतर रविवारी ९ नोव्हेंबर रोजी शाळेने मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात विरंगुळा मिळावा म्हणून भंडारदरा या ठिकाणी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. सकाळी पाच वाजता श्री गो.से हायस्कूल येथून निघाली. दुपारी भोजनानंतर भंडारदरा येथील ऑर्थर लेक अर्थात विल्सन धरण, रंधा डॅम अशा विविध नैसर्गिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन कळसुबाई शिखराचे दर्शन घेऊन शिक्षकांनी निसर्गाचा परिपूर्ण आनंद लुटत निसर्गाच्या सानिध्यात विविध छायाचित्र घेत फोटोग्राफीचा आनंद घेतला. प्रवासादरम्यान गीत गायनाचा आणि नृत्याचा देखील सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनमुराद आनंद घेतला.परतीच्या प्रवासात चांदवड जवळील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या रेणुका देवीचे दर्शन घेऊन सहलीशी सांगता झाली.

शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे सपत्नीक या सहलीत सहभागी झाले होते.उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील,पर्यवेक्षक आर.बी.तडवी,आर.बी. बांठिया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर,सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिण्य , कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी सहलीत सहभागी झाले होते. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहलीबद्दल मुख्याध्यापकांचे आभार मानले तर अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी.जोशी, स्थानिक समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.