उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे डॉक्टर डे उत्साहात साजरा

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे डॉक्टर डे उत्साहात साजरा

दिनांक १ जुलै २०२३ ला डॉक्टर डे उत्साहात साजरा करण्यात आला.देवानंतर कोणाला मानलं जातं ते म्हणजे डॉक्टर.कोरोना काळात सर्वांना याची प्रचिती आली की या धरतीवर देवानंतर कोण असेल तर ते म्हणजे डाक्टर व नर्सेस .हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू..
उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे डॉक्टरांच्या मानसन्मानासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. सर्व डाॅक्टरांना डाॅक्टर डे हार्दिक शुभेच्छा दिल्या.भारताच्या पहील्या महीला डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून दिपप्रज्वलन करून सर्व डॉ.चे स्वागत करण्यात आले.डाॅ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ.मुंजनकर, डॉ देशपांडे गायनाॅकालाॅजिस्ट दत्ता मेघे इन्स्टिट्युट, डॉ.शेख वैद्यकीय अधीकारी, डॉ दारूंडे वैद्यकीय अधीकारी, डॉ.झाकिया खान, डॉ.हरियानी , डॉ.विश्वंभर वैद्यकीय अधीकारी, डॉ.सौ .पवार डॉ.विश्वंभर सोनोग्राफी तज्ञ ,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी प्रास्ताविक केले.त्यात त्यांनी डॉक्टर डे चे महत्व समजावून सांगितले.डाॅ आनंदीबाई जोशी यांच्या जीवनातील आदर्श घेवून खारीचा वाटा उचलावा आपलं जीवनमान उंचवाव.आणी आपणं ऊत्तोरत्तर प्रगती करावी.आणी सामाजिक बांधिलकी जपुन आपले कर्तव्य करावे आणि भरपूर शुभेच्छा देवून प्रस्तावित समाप्त केले.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ सोनाली राईसपायले यांनी केले व आभारप्रदर्शन सौ रुबिना खान यांनी केले यामध्ये श्री येडे व सौ रूबीना खान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.व वाढदिवसानिमीत्य डॉ.ना गिफ्ट देण्यात आले.तसेच सर्व डॉक्टर्स यांनी केक कापून डाॅक्टर डे साजरा केला.
या कार्यक्रमांचे आयोजन सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी केले.या कार्यक्रमाला सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका,सौ रूबिना, सपना राठोड,सौ कापटे,सौ सोनल दांडगे,कु प्रणाली गाथे,कूंदा मडावी, अमोल भोग,बंडु पेटकर, यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाला सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते