इंदुरीकराच्या शाही साखर पुड्याला जोरदार झटका, त्यांच्याच आदर्श घेऊन जवखेडे येथे साखर पुडयातच साधेपणाने लग्न सोहळा संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) हरीभक्त परायण निव्रुती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी किर्तनातून सांगितलेल्या “लग्न साधेपणाने साजरे करा” या उपदेशाचे तंतोतंत पालन करीत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धांबोरी येथील प्रगतिशील शेतकरी दगडू रखमाजी खेडेकर यांचे नातू आणि सौ.सुनिता व देवराम दगडू खेडेकर यांचे चिरंजीव “अनिकेत” आणि जवखेडे खालसा तालुका पाथर्डी येथील स्व.तुकाराम किसन मतकर यांची नात आणि सौ.जिजाबाई व देविदास तुकाराम मतकर यांची सुकन्या चि.सौ.का. “सुवर्णा” (सुषमा) या उभयतांचा साखर पुड्यातच विवाह सोहळा अतिशय साधेपणाने जवखेडे खालसा येथे संपन्न झाला.अनावश्यक खर्चाला फाटा देऊन साखर पुड्यातच लग्न लावा असा प्रस्ताव धांबोरी येथील रहिवासी व डॉक्टर बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक बाबासाहेब सोनवणे आणि जवखेडे खालसा येथील प्रगतिशील शेतकरी आणि जेष्ठ नेते पोपटराव आंधळे यांनी मांडला असता वधु आणि वराच्या दोन्ही कुटुंबांनी या प्रस्तावाला मांन्यता दिली आणि अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा साजरा करण्यात आला.ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनातून सांगितलेल्या उपदेशाचे येथे तंतोतंत पालन करण्यात आले. या साधेपणा मुळे मात्र दस्तूरखुद्द निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीच्या साखर पुड्यातील शाही बडेजावाला जोरदार झटका बसला आहे.कारण इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून सांगितलेल्या उपदेशाचे सर्व सामान्य माणसं बरोबर पालन करीत आहेत.पण महाराजांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या शाही साखरपुडा समारंभात केलेला वारेमाप खर्च पाहुण सर्व सामान्य लोकांच्या मनात इंदोरीकर महाराजा विषयी तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे.” नारदाच्या गादीवरून लोकासांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण”असे काम महाराजां कडून झालेलं आहे.पुर्वीच्या काळातील संतांनी “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले”.”आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे आपल्या आचरणाचे काटेकोरपणे पालन केले होते.आणि आताच्या काळात इंदोरीकर महाराज स्वतःला एक नामवंत सामाज प्रबोधनकार म्हणून घेत आहेत.किर्तनातून कथन करायचे एक आणि स्वतःवर वेळ आली की करणी मात्र वेगळी करायची या दुटप्पी भूमिकेमुळे लोकांच्या मनात इंदोरीकर महाराजा विषयी तीव्र नापसंतीची भावना आणि नाराजीचा सूर निघत आहे. जवखेडे खालसा येथील मतकर + खेडेकर या लग्न सोहळ्यासाठी बाबासाहेब महाराज मतकर, सरपंच चारुदत्त वाघ,ग्रामपंचायत सदस्य अमोल मतकर,माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे खंदे समर्थक युवा नेते अमोल वाघ, अमोल जाधव, वैभव आंधळे, संतोष मतकर,रोहिदास मतकर, बाळासाहेब मतकर, भाऊसाहेब मतकर,नामदेव मतकर, आबासाहेब मतकर,आसाराम मतकर,विक्रम मतकर,संजय मतकर,राहुरी तालुक्यातील धांबोरी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब जाधव,भाऊराव खेडेकर,अर्जुन खेडेकर, विठ्ठलराव वाडगे, एकनाथ नाना वाडगे,कैलास पाटोळे,निवृत्त पोलीस अधिकारी रावसाहेब खेडेकर, भाऊसाहेब खेडेकर,झुंबर खिलारी,बापु जाधव,जगन्नाथ सोनवणे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता लग्न साधेपणाने करा अशी जी नारदाच्या गादीवरून ह.भ.प. इंदोरीकर महाराजांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीची येथे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.राहुरी कारखान्याचे संचालक बाबासाहेब सोनवणे यांनी आपल्या बंधुचे लग्न ही अत्यंत साधेपणाने केले होते.त्यांच्याच पुढाकाराने हे दुसरेही लग्न साधेपणाने लावण्यात आले. या लग्नात कोणत्याही प्रकारचे आहेर, फेटे,शाली, मानपान, भांडीकुंडी, भेटवस्तू यांना फाटा देऊन हा साखर पुड्यातच विवाह सोहळा संपन्न झाला.आज समाजाने या विवाह सोहळ्याचा आदर्श घेऊन भविष्याकडे वाटचाल करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.आजच्या युगात आपल्या मुलीच्या लग्नातील कर्ज काढून केलेला वारेमाप खर्च हा आजच्या वधु पित्याला कर्जाला कंटाळून आत्महत्येकडे घेऊन जाणारा मार्ग ठरू पहात आहे.त्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लग्न साधेपणाने करणे ही काळाची गरज बनली आहे.ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना आपल्या मुलीच्या लग्नात काय दिवे ओवाळायचे ते ओवाळू द्या पण आपण मात्र लग्न साधेपणाने करावे ही सर्व साधारण गरीब कुटुंबाची धारणा झाली आहे.
























