श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

 

 

पाचोरा दि. 17 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात परीक्षा विभागाच्या वतीने दि. 07 नोव्हेंबर 2025, शुक्रवार रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परीक्षेमध्ये विद्यार्थ्याचे वर्तन कसे असले पाहिजे? यावर मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या मा. प्रा. सुरेखा पालवे यांनीही प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी परीक्षेसाठी विद्यापीठाने दिलेले नियम, पर्यवेक्षण करताना घ्यावयाची काळजी, मूल्यमापन करताना येणाऱ्या अडचणी अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या शुभहस्ते अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. तडवी यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, परीक्षा विभागप्रमुख डॉ. के. एस. इंगळे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शुभम राजपूत, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. गौतम निकम, प्रा. सागर पाटील, प्रा. गोकुळ कऱ्हाडे, डॉ. प्राजक्ता शितोळे, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. जयश्री वाघ, प्रा. संजिदा शेख, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, प्रा. जयश्री महाजन, प्रा. काजल पाटील, प्रा. प्रियंका पाटील, परीक्षा विभाग लिपिक श्री. संतोष महाजन, श्री. राजेंद्र पाटील, श्री. एस. के. पाटील, प्राध्यापक, कार्यालयीन अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.