अहिल्यानगर येथील राज्यस्तरीय खो–खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी उत्साहात….!!!!!
जळगाव (क्रीडा प्रतिनिधी)– महाराष्ट्र खो–खो असोसिएशनतर्फे अहिल्यानगर येथे पार पडणाऱ्या ५१ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो–खो स्पर्धेसाठी आज रविवार दिनांक १६/११/१०२५ रोजी निवड चाचणी खेळाडूंच्या मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
ह्या निवड चाचणी साठी जळगांव जिल्ह्याचे माजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय खो–खो खेळाडुंनी सदिच्छा भेट दिली.त्यात हरेश्वर कोयते,हुसेन पिंजारी,भरते यांचा समावेश होता,तसेच महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव जयांशू पोळ,जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष एन.डी सोनवणे,जळगांव जिल्हा खो–खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ,राज्य क्रीडा (खो–खो) मार्गदर्शक मीनल थोरात,दत्तात्रय महाजन,राहुल चौधरी,विशाल पाटील,दिलीप चौधरी,स्वप्निल कोळी,गोपाळ पवार,मिलिंद महाले,लक्ष्मण वळवी,सुप्रिया पाटील आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील ८३ कुमार व ४१ मुलींनी निवड चाचणीत सहभाग नोंदवला.

















