पाचोरा महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प उत्साहात संपन्न

पाचोरा महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प उत्साहात संपन्न

पाचोरा दि. 24 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ व तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:३० वाजता मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
सदर मतदार नोंदणी कॅम्पमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचोरा तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी मा. श्री. कैलास चावडे साहेब उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करून मतदार नोंदणीची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना मतदार म्हणून लोकशाहीत आपली भूमिका किती महत्वाची आहे हे स्पष्ट केले व जागरूक व दक्ष नागरिक बनण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात नायब तहसीलदार मा. श्री. रणजीत पाटील यांनी मतदान नोंदणीबाबत माहिती दिली व नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. यानंतर मतदान नोंदणीच्या अर्जाचे विद्यार्थ्यांना श्री. जयंत जाधव व श्री. कांतीलाल तेली यांच्याद्वारे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील उपस्थित होते त्यांनी अध्यक्ष मनोगतात मतदार म्हणून नोंदणी किती आवश्यक आहे हे विदित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ. के. एस. इंगळे (नोडल अधिकारी – मतदार जनजागृती) यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ. जे. डी . गोपाळ, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. विशाल कापसे, प्रा. रोहित पवार, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. गौतम निकम उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षेकतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी असे एकूण १३० जन उपस्थित होते.