वसंत पंचमीचे औचित्य साधत पारंपारिक भाजलेल्या रोडग्यांची मेजवानी व वनभोजन

वसंत पंचमीचे औचित्य साधत पारंपारिक भाजलेल्या रोडग्यांची मेजवानी व वनभोजन

प्रगतिशील शेतकरी शंकर अर्जुन पाटील व ज्ञानेश्‍वर अर्जुन पाटील यांच्या शेतात वसंत पंचमीच्या औचित्य साधर शेतात विराजमान मुंजोबांची पूजाविधी करून पारंपारिक भाजलेल्या रोडग्यांची मेजवानी करत वनभोजनाचा आनंद उपस्थितांनी घेतला. गोराडखेडा तालुका पाचोरा येथील रहिवासी कै अर्जुन सुखदेव पाटील हे शेतात प्रत्येक वर्षी वसंत पंचमीला भाजलेले रोडगे (बट्टी), दाळ, भात,भाजी व गुळ ह्या पदार्थांचे जेवण ठेवत व गावासह परिसरातील संबंधितांना भोजनासाठी आमंत्रित करत. त्यांचे सुपुत्र शंकर अर्जुन पाटील व ज्ञानेश्वर अर्जुन पाटील दोन्ही भावंडांनी वडिलांची परंपरा कायम ठेवत यावर्षीही वसंत पंचमी म्हणजेच दि.२६ जानेवारी रोजी वनभोजनाचे आयोजन केले होते. यातील विशेष आकर्षण म्हणजे पारंपारिक पद्धतीने शेणाच्या गौर्या जाळून त्यात भाजलेले रोडगे (बट्टी) होय. त्यामुळे उपस्थितांना या मेजवानीचे आकर्षण असते. यात आमंत्रित साधारण चारशे व्यक्तींचा स्वयंपाक या पद्धतीने केला जातो हे विशेष. त्यामुळे उपस्थितत या स्वादिष्ट मेजवानी सोबतच वनभोजनाचाही आनंद घेतात व समाधान व्यक्त करतात.