के सी इ सोसाईटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलीटेकनिक विभागा तर्फे गुरु पौणिमा उत्साहात साजरी

के सी इ सोसाईटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलीटेकनिक विभागा तर्फे गुरु पौणिमा उत्साहात साजरी

 

 

के सी इ सोसाईटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलीटेकनिक विभागातर्फे गुरु पौणिमा उत्साहात साजरी केली . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंची गरज कोणत्याही आयुष्यात ही भासणारच असते. गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आयुष्यात असते कारण ‘गुरूविना ज्ञान नाही’ असंच आपण म्हणतो. त्यामुळे ज्ञानार्जनासाठी गुरूची गरज ही असतेच. गुरू-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीतील एक अनमोल परंपरा आहे. प्राचीन काळापासून ही परंपरा आपल्याला ज्ञान व संस्कारांचा अनमोल ठेवा देत आली आहे. आजच्या आधुनिक काळात ही परंपरा काहीशी बदललेली दिसते, तरीही तिचे महत्त्व अद्याप कायम आहे. आजच्या काळात शिक्षणाची साधने व तंत्रज्ञान खूप प्रगत झाली आहेत. त्यामुळे गुरूंनी शिष्यांना ज्ञान देण्याच्या पद्धतीत बदल घडून आले आहेत. आजच्या गुरूंनी आपल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देणे आवश्यक बनले आहे. तसेच, गुरूंनी विद्यार्थ्यांना नवनवीन संधींविषयी माहिती देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचे ठरते.गुरुपौर्णिमेचे औचित्य लक्षात घेऊन पॉलीटेकनिक मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉप्युटर विभागातर्फ उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके भेट देण्यात आलीत. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, पॉलीटेकनिक विभागाचे समन्वयक डॉ सी एस पाटील ,इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा .अर्चना शेवाळे ,कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा.तुषार धुमाळ ,इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा .जगदीश पाटील ,मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा .पूजा अडवाणी व इतर शिक्षक वृंद ,विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा विजय चौधरी यांनी केले.