पिंप्री खु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव निमित्ताने अभ्यासिका चे उदघाटन

पिंप्री खु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव निमित्ताने अभ्यासिका चे उदघाटन

तरुणांनी वाचनावर भर देण्याचे पंचायत समिती सभापती मुकुंद नंनवरे यांचे आवाहन

परमपूज्य महामानव बोधिसत्व विश्वरत्न प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ,धरणगाव पंचायत समिती चे सभापती मा मुकूंद नंनवरे यांच्या हस्ते अभ्यासिके चे फीत कापून व अनमोल ग्रंथ, पुस्तक यांचे पूजन करून, त्रिरत्न अकॅडमी पिंप्री येथे उदघाटन करण्यात आले. या वेळेस महापुरुषांना अभिप्रेत कार्य आपण कसे पूर्ण करू शकतो . जयंती निमित्ताने प्रबोधनातून चळवळ मजबूत व सर्व सामाजिक सामंजस्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत हे कार्य पुढे नेऊ या. तसेच आज च्या युवक वर्ग ने वाचनावर भर देण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती मुकुंद नंनवरे यांनी केले.

बाळू सपकाळे यांनी प्रास्ताविकात तमाम जनतेला शुभेच्छा देत या नवीन उपक्रम साठी उद्देश व अभिप्रेत कार्य ची मांडणी मांडत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या वेळेस पिंप्री ग्रामपंचायत चे उपसरपंच मा मंगल आणा पाटील, सदस्य मा सुनील बडगुजर सर ,मा शांताराम भिल . आदी उपस्थित होते. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम दोडे, राजेंद्र लोखंडे, दिलीप महाले ,राहुल वाघ, अमोल कोळी , विनोद बीजबीरे,रोहित मोरे, आकाश पाथरवट, राज अहिरे , शुभम दोडे , दीपक पाथरवट , राहूल पाथरवट, सिद्धार्थ लोखंडे. आदी नि परिश्रम केले.

ग्रामपंचायत सदस्य मा सुनील बडगुजर सर यांनी शेवटच्या पुष्पा मध्ये भविष्यात करता येणाऱ्या गोष्टी व कोरोना काळात आज मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुलाना वाचन कसे आवश्यक आहे हे पटवून देत ,ग्रामीण भागात या प्रकाराची अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल भरभरून कौतुक करत नवनवीन पुस्तकांची भर घालून अधिक जोमाने कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात व मान्यवरांचे आयोजकां कडून आभार मानले.कोरोना चे नियम पाळत सर्व कार्यक्रम यशस्वी झाला.

या प्रसंगी भविष्यात अधिकाधिक उपक्रम राबवणार असल्याचे सतिश शिंदे यांनी सांगितले.