सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे शालेय गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे शालेय गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

पाचोरा  प्रतिनिधी
पाचोरा शहरातील सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरजू, होतकरू गरीब विद्यार्थ्यांना २३ जुलै रोजी शहरातील सु. भा. पाटील विद्यामंदिरात गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, वासुदेव महाजन, सतीश चौधरी,जगदीश सोनार, वाघ डेरीचे संचालक विकास वाघ, सुजित तिवारी, श्री. गो. से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, सु. भा. पाटील विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अशोक परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तर विशेष सहकार्य म्हणून वैष्णवी थोरात, संकेत थोरात, माधुरी थोरात, संदीप मनोरे, . प्रयत्न केले.मान्यवरांच्या हस्ते गरजु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या गणवेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी रोशन कुमार शर्मा, मधुकर महाजन, विठ्ठल महाजन, संजय कुलकर्णी, सागर थोरात, विशाल थोरात तसेच सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देविदास थोरात यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.