पाचोऱ्यात संविधान दिनानिमित्त जनचेतना रॅली व व्याख्यानाचे आयोजन: उपस्थितीचे आवाहन

पाचोऱ्यात संविधान दिनानिमित्त जनचेतना रॅली व व्याख्यानाचे आयोजन; उपस्थितीचे आवाहन

पाचोरा (वार्ताहर) दि,२४
पाचोरा नगरपरिषद ,विविध सामाजिक संघटना व संविधान प्रबोधिनी कार्य नागरी समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनमानसात प्रबोधित करण्यासाठी पाचोरा शहरात संविधान दिनानिमित्त शनिवारी (ता २६) सायंकाळी ५ वाजता पाचोऱ्यात एम एम कॉलेज शेजारील महाराणा प्रताप चौक ते डॉ बाबाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत नागरिकांची पायी रॅलीचे आयोजन केले आहे. रॅली मार्गात छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार असून रॅलीच्या समारोप प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे *ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर* यांचे *”स्वराज्य ते संविधान व वर्तमान”* या विषयावर जन प्रबोधनात्मक व्याख्यान होणार असून सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी या रॅली सह व्याख्यानाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शहरातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सत्यशोधक समाज क्षत्रिय ग्रुप भारतीय बौद्ध महासभा कास्ट्राईब महासंघ बामसेफ मूलनिवासी संघ संत रविदास युवक मंडळ भारत मुक्ती मोर्चा फुले शाहू आंबेडकर प्रबोधिनी राजे संभाजी युवा फाउंडेशन उदयनराजे समर्थक ग्रुप समता सैनिक दल बहुजन शिक्षक संघ पाचोरा वकील संघ वाल्मिकी मित्र मंडळ राष्ट्रीय चर्मकार संघ जय लहुजी संघटना माळी महासंघ अहीर सुवर्णकार मंडळ एकता ऑटो रिक्षा युनियन व नगरपरिषद कर्मचारी संघटना यांचा याचे या कार्यक्रमात सहकार्य मिळत असून या अराजकीय कार्यक्रमास सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण ब्राह्मणे, धनराज पाटील(डी एन), जय वाघ, राजरत्न पानपाटील, दीपक शेजवळ ,विकास पाटील, सुनील पाटील, प्रदीप जाधव, एस के वानखेडे, सुनील शिंदे, खलिलदादा देशमुख,अजहर खान, अजहर मोतीवाले, फिरोज खान यांचेसह आदींनी केले आहे