पाचोऱ्यात बहुरूपीच्या माध्यमातून पत्रकारांने केली मतदानाची जनजागृती! पत्रकार राहुल महाजन याचा लक्षवेधी उपक्रम

पाचोऱ्यात बहुरूपीच्या माध्यमातून पत्रकारांने केली मतदानाची जनजागृती! पत्रकार राहुल महाजन याचा लक्षवेधी उपक्रम

 

 

पाचोरा शहरात अनेक सुशिक्षित तरुण वर्ग विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असतात आपण समाजामध्ये वावरत असतांना समाजाला काहीतरी देणे लागतो. मग आपले विचार, बुद्धी, ज्ञान तसेच कला जे समाजाला देता येईल ते’ आपण समाजाला दिले पाहिजे. अश्या हेतूने समाजामध्ये सामाजिक कायम सामाजिक बांधिलकी जपणारा एक छंद म्हणून पत्रकारिता क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेला सुशिक्षित युवक तरुण राहुल महाजन यांचा हॉटेल व्यवसाय असून ते समाजामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक सामाजिक उपक्रम करीत असतात. यातच देशभरात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाचोरा शहरात बहुरूपी बाहुल्यांच्या सोबत बाजारपेठेमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी मतदान करा अशा पद्धतीने मतदानाची जनजागृती पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून राहुल महाजन यांनी केलेली आहे. पत्रकार म्हणून शासनाला नेहमी सहकार्य करणे व निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाला देखील मदत करणे हे आपले कर्तव्य तसेच नैतिक जबाबदारी समजून काम करत असलेल्या महाजन यांच्या कार्याचे शहरातून सर्वांच्या माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे.