पाचोरा येथील गांधी चौकातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री कांतीलाल शेठ यांची नात दीक्षा घेणार

पाचोरा येथील गांधी चौकातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री कांतीलाल शेठ यांची नात दीक्षा घेणार

पाचोरा, प्रतिनिधी ( अनिल येवले )
पाचोरा येथील गांधी चौकातील सोन्या – चांदीचे प्रसिद्ध व्यापारी श्री कांतीलाल शेठ शहा यांची नात मुमुक्षु कु इशिका बेन गौतम चंदजी राठोड चेन्नई येथील रहिवासी यांनी पाचोरा येथे जैन भगवती दीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावेळेस सर्व परिवार सर्व नातेवाईक व सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन पाचोरा येथे जैन मंदिर येथून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे जल्लोषात स्वागत व सत्कार व सदभावना दिल्या. सर्व परिवाराने व समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा देऊन “साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा” या म्हणीप्रमाणे त्यांनी तिचे दीक्षाभूमी घेण्यासाठी सर्वत्र सहकार्य करून तिला जैन धर्माप्रमाणे जैन मंदिरात सर्व विधी व सर्व कार्यक्रम करून केला संन्यासासाठी रावांना केले यावेळी पाचोरा शहरातील जैन समाज बांधव सोनार बांधव व गांधी चौकातील रहिवाशी यांचा समावेश होता.त्या कार्यक्रमाच्या वेळी पाचोरा येथील जैन सकल श्रावक संघ व पाचोरा सराफ असोसिएशन व इतर मंडळी तसेच समाजातील सर्व महिला उपस्थित होत्या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन पाचोरा जैन सकल श्रावक संघ यांनी केले होते.