मागणी मान्य न झाल्यास १ डिसेंबर पासुन लोहारा सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांचा आमरण उपोषणाचा इशारा

मागणी मान्य न झाल्यास १ डिसेंबर पासुन लोहारा सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांचा आमरण उपोषणाचा इशारा

मंजुर झालेल्या लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राची – नवीन इमारत बांधकामास ( कार्य आरंभ आदेश ) तात्काळ न दिल्यास ग्रामपंचायत सरपंच,सदस्य आणि ग्रामस्थ हे १ डिसेंबर पासुन जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचे लेखी दिले निवेदन

पाचोरा प्रतिनिधी : लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत फार जुनी व जिर्ण स्थितीत असल्याने आरोग्य केंद्राच्या इमारतीचे स्लॅब व इमारत केव्हा कोसळेल हे सांगता येऊ शकत नाही.त्यामुळे उपचारासाठी येणारे रूग्णांची जीव धोक्यात असुन भविष्यात फार मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्न असल्याने सदर कामा संदर्भात जिल्हा परिषद मधील पदाधिकारी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर अखेर शासनाकडुन नवीन इमारत बांधकामासाठी ३ कोटी ५४ लाख ७८ हजार ५५९ रू निधी देऊन सदर कामाची प्रशासकीय मान्यता दिनांक २७/०३/२०२० रोजी दिली.त्यानंतर सदर अंदाज पत्रकास दिनांक १४/०८/२०२० ला तांत्रिक मान्यता देऊन दिनांक २०/११/२०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा इमारत बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.सदरची निविदा दिनांक २९/०१/२०२१ रोजी उघडण्यात आली असता नियमानुसार निविदेत प्रसिद्ध करतांना –

प्रसिद्ध केलेल्या अटी व शर्ती नुसार मान्य करून श्री.सुनिल एन पाटील जळगाव यांची निविदा सर्वात कमी असल्याने त्यांना कार्य आरंभ आदेश देणे अपेक्षित असतांना तसं न होता ती निविदा अपुर्ण असल्याने ती फेटाळल्याने संबंधित ठेकेदार -श्री.श्री.इन्फास्ट्रक्चर जळगाव यांनी त्या विरोधात मे.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करून न्याय मागितला असता रिट याचिका मे.उच्च न्यायालय खंडपीठाने फेटाळली.

याचिका फेटाळल्यानंतर जिल्हा परिषद कडुन सदर बांधकामाबाबत पुढील कारवाई जलद गतीने होणे अपेक्षित असतांना तरी तशी कार्यवाही झाली नाही.कारण त्यामध्ये काही स्थानिक व वरीष्ठ राजकारण होते.म्हणुन ते काम रखडले.

तरी ज्या ठेकेदारांची परीपुर्ण निविदा व कमी किंमतीचे निविदा असतील त्यांना तातडीने कार्य आरंभ आदेश तातडीने द्यावा आणि जनतेच्या जीवाशी खेळु नये यासाठी येत्या १ डिसेंबर २०२१ च्या पुर्वी हा कार्य आरंभ आदेश प्राप्त झाला नाही तर दिनांक १ डिसेंबर २०२१ पासुन आमरण उपोषणाला जिल्हा परिषद कार्यालय जळगाव समोर लोहारा सरपंच,सदस्य आणि ग्रामस्थ बसतील असा तीव्र इशारा देण्यात आला आहे.