वेळ पडल्यास मतदार संघातील जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरले मा.आ.दिलीप ओंकार वाघ

वेळ पडल्यास मतदार संघातील जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरले मा.आ.दिलीप ओंकार वाघ

पाचोरा ( प्रतिनिधी)

भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंवाद यात्रा सुरू असून या यात्रेस खेळ पाण्यातून प्रचंड उत्साह प्रोत्साहन मिळत आहे नागरिक गावकरी आपल्या समस्या मांडताना माजी आमदार दिलीप वाघ यांच्याकडे व्यक्त करून आपल्या हक्काचा माणूस म्हणून गाऱ्हाणे मांडत आहे. व केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या बद्दल त्रिव संताप व्यक्त करत आहे. माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी या समस्येचा निराकरण करण्यासाठी गावकऱ्यांना आश्वासन देऊन प्रत्यक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांची बोलून समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने काल पेंडगाव, शिंदी,आणि कोळगाव पिंप्रीहाट मा.आमदार दिलीप भाऊ यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत जनतेशी संवाद साधला..
यात प्रामुख्याने जनतेच्या शेत शिवार रस्ते,पिकविमे,आणि दुष्काळी पंचनामे न झाल्याच्या अनेक लोकांनी दिलीप भाऊ यांच्याकडे तक्रारी मांडल्या..
यात तर एका व्यक्ती ने उभे राहून आमदारांना रस्ता बनवा अस सांगितले तर आमदारांनी मी रस्ता बनवू शकत नाही भले तर मला मतदान देऊ नका अशा प्रकारे उत्तर दिल्याची तक्रार मांडली.
जनतेला प्रतिउत्तर देताना आमदार वाघ म्हटले
की पैशांचे खोके देऊन सरकार पाडण्यात भाजप ला असुरी आनंद मिळत असतो सध्याच्या मंत्री मंडळात,महाविकास आघाडीच्या तुलनेत अनुभव हीन मंत्री पाहायला मिळत आहे..
स्वतः मुख्यमंत्री मी रिक्षा चालक ते मंत्री अस सांगत असताना सेनेने त्यांच्यावर केलेले उपकार विसरले आणि त्यांनी भाजप सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं काम करत सेनेच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजिर भोकल्याचा घणाघात दिलीप भाऊ यांनी केला..
कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना अब्दुल सत्तार याना कृषी खात देऊन शेतकऱ्यांचे आणि कृषी खात्याचे अप्रत्यक्ष नुकसान या सरकारने केले आहे,
शेतकरयांच्या खतावर GST लावणार हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही,
मतदारसंघातील प्रमुख समस्या विरोधी पक्षनेते अजित दादा यांच्या कानावर टाकून सोडवण्यासाठी मी आणि माझ्या पक्षाचे पदाधिकारी सक्षम आहोत शेतकऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रसंगी मी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास ही तयार असल्याचे त्यांनी म्हटले..
जनसंवाद यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून जनतेचे अनेक प्रश्न मा.आमदार दिलीप वाघ यांच्याकडे मांडले जात आहेत..