डॉ अपर्णा देशमुख यांना पुणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत च्या स्वामी विवेकानंद युवा ह्या प्रतिष्ठित व प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित

आभामाया वृध्दाश्रम संचालिका डॉ अपर्णा देशमुख पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत च्या स्वामी विवेकानंद युवा ह्या प्रतिष्ठित व प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत च्या वतीने दिल्या जाणारा अत्यंत प्रेसटीजियस सन्मानजनक स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार आभाळमाया वृध्दाश्रम च्या सर्व सरव्या डॉ. अपर्णा देशमुख यांना महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा सौ.ताईसाहेब अलका पेटकर यांचे शुभहस्ते स्वामी विवेकानंद प्रतिमेचे स्मृती चिन्ह ,शाल श्रीफळ व 41000 रुपये चा महाराष्ट्र बँक पुणे चा धनादेश प्रदान करून त्यांचे ज्येष्ठ नागरिकांना प्रती करीत असलेल्या कार्याचा गौरव करीत सन्मानित करण्यात आले आहे.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा कोवीड पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंध चे पालन करीत छोटे खानी कार्यक्रमात आभाळमाया वृध्दाश्रम पुणे येथे राष्ट्रीय स्वयसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांनी आयोजित कार्यक्रमात करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती च्या बहुआयामी उपक्रमाची माहिती देत स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार स्वरूप व महत्व विषद केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा सौ. ताईसाहेब अलका पेटकर यांचे शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांचे आदर्श व्यक्तिमत्व व त्यांची समाजातील दुःखी पिडीतांसाठी आदर्श तत्व कार्यप्रणाली वर आधारित गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत डॉ.अपर्णा देशमुख आभाळमाया वृध्दाश्रम सन 2010 पासून सातत्य पूर्ण कार्याचा गौरव करीत स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार शाल श्रीफळ व स्वामी विवेकानंद प्रतिमा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ व 41000 रुपये चा धनादेश प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा सौ.ताईसाहेब अलका पेटकर ,प्रांत संघटन मंत्री आदरणीय शरद खाडिलकर ,सह कार्यवाह श्री. जयंत लोकरे,प्रांत सह कार्यवाह श्री.विनायक दंबिर , श्री .अश्विनीकुमार उपाध्ये पुणे महानगर कार्यवाह ,प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री .तुषार जुवेकर ,श्री. राहुल मंडिकर आदी मान्यवर, पुरस्कारथी डॉ. अपर्णा देशमुख व त्यांचे माता सौ.ताईसाहेब निर्मला देशमुख ,पिता डॉ.अनिल देशमुख ,बंधू डॉ.अमित देशमुख व आभाळमाया ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.