सामनेर येथे उद्या पासून सुरू होणार रंभाई देवी यात्रोत्सव

सामनेर येथे उद्या पासून सुरू होणार रंभाई देवी यात्रोत्सव

पाचोरा (प्रतिनिधी ) तालुक्यातील
सामनेर तालुका पाचोरा ता. सामनेर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंभाई मातेचा यात्रोत्सव दिनांक 9 पासून सुरू होत आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी येत असल्याने ग्रामस्थांनी यात्रेची तयारी केली आहे.
यात्रोत्सव आख्यायिका
रम भैय्या सामनेर येथील चव्हाण कुळातील सून होत्या त्यांचे माहेर हे नानखुर्द तालुका एरंडोल येथील होते त्या पवार घराण्यातील कन्या होत्या ज्या दाम्पत्याला संतती होत नसेल एखाद्याच्या दुर्धर आजार उपचार करूनही बरा होत नसेल तर लोक रम भाई देवीची भक्ती करायचे ज्यामुळे संतती प्राप्त होऊन जोरदार आजारही बरे व्हायचे देवीचा हा महिमा सर्वदूर पसरल्यानंतर येथे दर्शनासाठी गर्दी होऊ लागली व त्यातूनच या यात्रोत्सवाचे कोजागिरी पौर्णिमा ला आयोजन होण्यास सुरुवात झाली.
बोकड बळीची प्रथा बंद
काही वर्षापूर्वी रभाई देवीला यात्रोत्सवानिमित्त बोकड बळीची प्रथा सुरू होती. मात्र सर्व गावकरी एकत्र येऊन बोकड बडी ऐवजी मिस्टन्न नैवेद्य देवीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हापासून पूर्णपणे बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली जवान परिवारात परंपरागत पद्धतीने भाऊबंदकीतील एक एक याप्रमाणे यात्रोत्सव साजरा केला जातो यावर्षी चे यात्रोत्सवाचे मानकरी कैलास रूपचंद चव्हाण व बाळू रूपचंद चव्हाण हे आहेत.
नाटक ऐवजी कीर्तन
पूर्वी पासून यात्रेचता निमित्त गावातील तरुण नाटक महिनाभर सराव करतव आदल्या रात्री नाटक सादर करत आता नाटक ऐवजी कीर्तन चां कार्यक्रम होतो.

यात्रेनिमित्ताने दिनांक 9 रोजी रात्री लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार असून दुपारी तगतरावची मिरवणूक काढून तमाशा कलावंतां तर्फे ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाणार आहे यात्रेत विविध खाद्यपदार्थ खेळणी पाळणे संसार उपयोगी साहित्य आधीचे दुकाने फाटले आहेत यात्रोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान चव्हाण परिवार व समस्त ग्रामस्थांनी केले आहे