गोंदेगाव येथे भैरवचंडी सेवेत 63 सेवेकरींचा सहभाग

गोंदेगाव येथे भैरवचंडी सेवेत 63 सेवेकरींचा सहभाग

पाचोरा- श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र (दिंडोरी प्रणित) या संस्थेचे संस्थापक परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदेगाव ता. सोयगाव येथे भैरवचंडी सेवा घेण्यात आली. पाचोरा- गोंदेगाव पंचक्रोशीतील 63 सेवेकरींनी या सेवेत सहभाग नोंदवला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक, गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचा दिनांक 18 मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात व देशात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गोंदेगाव ता. सोयगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक 14 मार्च रोजी कालाष्टमी निमित्ताने भैरवचंडी पाठ पठणाची सेवा घेण्यात आली. 63 स्वामी समर्थ सेवेकरी बंधू-भगिनींनी या प्रसंगी आपली सेवा रुजू केली.

प पु गुरूमाऊलींच्या व आदरणीय दादासाहेब यांच्या आर्शिवादाने गोंदेगाव स्वामी समर्थ केंद्र येथे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या या आध्यात्मिक सेवेत गोंदेगाव येथील स्थानिक, शशिकांत गरुड सेवेकरी आनंदा मोरे , सिमाताई मोरे,आशाताई सोनवणे, मनिषा पाखले, यामिनी महालपुरे,शारदाताई निकम, आशाताई पा, आकाश महालपुरे , मिराताई निकम यांनी आधिक परिश्रम घेतले.

तसेच पाचोरा येथून सुभाष पाटील, बाळु चित्ते, वंदना चित्ते सुधीर सर, हर्षल पाटील, वैशाली महाजन, सुनंदा वारूळे, शारदा पाटील,अविता पाटील,वाणी ताई प्रतिभा, रेखा पाटील तसेच विकास पाटील- ,(वडगाव), विश्वजित पा-(शिंदाड), नानु पा-(शिंदाड), अरूण शिंदे-(निमखेडी) यांनी आपली ग्राम अभियानाची सेवा कार्यात आपले बहुमोल योगदान दिले
या अभिष्टचिंतन सोहळ्यातील विविध कार्यक्रमासाठी पाचोरा जणकल्याण, सिध्दमंगल पुजन टिम यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे