राज्यस्तरीय Abacus आणि Vedic Math स्पर्धेत पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी

राज्यस्तरीय Abacus आणि Vedic Math स्पर्धेत पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी

पाचोरा (प्रतिनिधी)
चाळीसगाव येथे 10 एप्रिल
2022 रोजी राज्यस्तरीय Abacus आणि Vedic Math ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक बक्षिसे मिळवून घवघवीत यश संपादन केले. Abacus च्या 4 लेव्हल आणि Vedic Math च्या 2 लेव्हल मध्ये पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षीस मिळवून राज्यभर नावलौकिक मिळवले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. आशिष पाटील, श्री दिनेश न्हावकर, श्री सुदर्शन पाटील, सौ .छाया पाटील, सौ .कांचन वाघ, सौ. मोनाली वरखेडे, सौ. मिनाक्षी मॅडम,श्रीमती. उपासने मॅडम,श्री.बावस्कर सर यांची लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच अकॅडमीचे संचालक श्री. रविंद्र पाटील सर आणि श्रीमती सपना शिंदे मॅडम यांचे पालकांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
अकॅडमी चे संचालक गेल्या 12 वर्षांपासून पाचोऱ्याच्या नामांकित बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कार्यरत आहेत. तसेच विविध प्रकारचे क्लास Abacus ,Vedic Math,
regular syllabus) घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मेहनतीने कार्य करतात.