तहसीलदार शिपाईला दोन हजारची लाच भोवली 

तहसीलदार शिपाईला दोन हजारची लाच भोवली

मगन गोमा भोई, वय-५२,
व्यवसाय-नोकरी, शिपाई,तहसिलदार संजय गांधी योजना,
तक्रारदार या घटस्फोटीत असुन त्यांच्या आई विधवा असल्याने त्यांनी तहसिलदार संजय गांधी योजना, नगरपालिका क्षेत्र कार्यालय, जळगाव येथे रितसर संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली अर्थसहाय्य मिळणेकामी अर्ज सादर केलेला होता व त्याबाबतची पोचपावती घेतलेली होती. नंतर बराच कालावधी झाल्याने तक्रारदार संबंधीत कार्यालयात अनुदान मंजुरीबाबत विचारपुस करायला गेले असता सदर आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगितले की, मी तुमचे व तुमच्या आईचे नावे अनुदान मंजुर करून आणुन देतो असे सांगुन त्यामोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष स्वतःसाठी प्रथम 5,000/- रुपये त्यात तक्रारदार यांच्या आईचे अनुदान मंजुर करून आणुन देणेसाठी 3,000/- रु व स्वतः तक्रारदार यांचे अनुदान मंजुर करून आणुन देणेसाठी 2,000/- रु असे एकुण 5,000-/ रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती तक्रारदार यांचे व त्यांच्या आईचे असे प्रत्येकी 2,000/-रुपयेप्रमाणे एकुण 4.000/- रु लाचेची मागणी केली. त्यापैकी प्रथम आईचे अनुदान मंजुर करून आणुन देण्यासाठी 2,000/-रु. लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम आलोसे यांनी स्वतः पंचासमक्ष तहसिलदार संजय गांधी योजना महानगरपालिका क्षेत्र कार्यालय, जळगाव येथे स्वीकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
तपास अधिकारी-
श्री.शशिकांत एस.पाटील ,पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक-
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
मार्गदर्शक-
1)मा.श्री.सुनिल कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2)मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3)मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.जिल्हाधिकारी सो. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव.