मुलीच्या बारशाच्या निमित्ताने औषधी जन्य रोपांचे वाटप, देशमुख-तावरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

मुलीच्या बारशाच्या निमित्ताने औषधी जन्य रोपांचे वाटप,
देशमुख-तावरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम….!

पाचोरा येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रवीण देशमुख (अस्थिरोगतज्ज्ञ) व डॉ अनुजा देशमुख (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याच्या (बारसे) निमित्ताने श्रीकृष्ण हॉस्पिटल व डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने उपस्थितांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी औषधीजन्य वनस्पती रोपांचे वाटप करण्यात आले. डॉ प्रवीण व अनुजा देशमुख यांच्या मुलीच्या नाम संस्कारा प्रसंगी मुलीचे नित्यश्री नामकरण करण्यात आले. प्रसंगी मुलीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांना पर्यावरणाचे महत्त्व सांगत डॉ दिनेश सोनार यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. साधारण तीनशे रोपांचे वाटप करत या रोपांची लागवड घरासमोरील गार्डनमध्ये, शेतात अथवा आपणास उपलब्ध जागेत करून आजच्या शुभदिनाची आठवण म्हणून व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता एक पाऊल पर्यावरण संवर्धनासाठी टाकत त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन डॉ प्रवीण देशमुख यांनी केले. प्रसंगी वैद्यकीय, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. तावरे देशमुख परिवार व डॉक्टर असोसिएशन आयोजित या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले व आपण यानिमित्ताने समाजात आदर्श निर्माण केला असल्याचे मत व्यक्त केले. यासोबतच निसर्गप्रेमींनी या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.