सततच्या पावसामुळे शेतकरी राजा आधीच अडचणी मध्ये सापडला असून खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती आ.किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक

पाचोरा ( वार्ताहर) दि, २४
सततच्या पावसामुळे शेतकरी राजा आधीच अडचणी मध्ये सापडला असून खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे आगामी रब्बी हंगाम तरी हातचा जाऊ नये, पिके वाचली पाहिजेत यासाठी मतदार संघातील सर्व नाला बांध, बंधारे आदींच्या दुरुस्ती साठीचे अंदाज पत्रके व सर्व अनुषंगिक माहिती तातडीने द्या जेणेकरून शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून जनतेला दिलासा देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आ.किशोर अप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले.कोकण च्या धर्तीवर आपल्या शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी मी शासनाकडे आग्रही असल्याचेही ते म्हणाले.
मागील पंधरवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुका व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेती, रस्ते, पूल बंधारे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आले होत्या दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी आ.किशोर अप्पा पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक प्रांताधिकारी दालनात घेतली. यावेळी महसूल, जिल्हा परिषद , जलसंधारण, जलसंपदा, एमएसईबी, पंचायत समिती,नगरपालिका, वनविभाग, पीकविमा आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरदेवळा पूल, कजगाव पूल,नेरी घुसर्दी, दिघी खाजोळा, कजगाव,वडगाव मुलाने, बाळद ,सामनेर ,नांद्राआदी ठिकाणी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेत कोणीही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, दोन्ही तालुक्याचे कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी तसेच जलसंधारण , जलसंपदा, जिल्हा परिषद , एम एस इ बी वनविभाग यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान या बैठकीला जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, डॉ विशाल पाटील, बाजार समिती प्रशासक युवराज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.