श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथे जिजाई रंगमंचाचे उद्घाटन संपन्न

श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथे जिजाई रंगमंचाचे उद्घाटन संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो.से .हायस्कूल पाचोरा येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय नाथाभाऊ ज्येष्ठ नेते एकनाथ रावजी खडसे साहेब यांच्या हस्ते फीत कापून रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले.संस्थेतील प्रांगणात सेवानिवृत्त शिक्षक अभिमन्यू दशरथ पाटील यांच्या नावाने व श्री रंजीत अभिमन्यू पाटील सर यांच्या प्रयत्नाने जिजाऊ रंगमंचाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी अभिमन्यू पाटील सर व जिजाबाई पाटील यांचा सत्कार अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील परिवारातर्फे अजित दादा पवार यांना रंगमंचाचे प्रतीक म्हणून रंगमंचाची प्रतिमा प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराती कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार माजी दिलीप भाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार वसंतराव मोरे, जळगाव निरीक्षक अविनाशजी आदिक, माझी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माझी मंत्री सतीश अण्णा पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार राजीव दादा देशमुख, माजी आमदार मनीष दादा जैन , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील उपस्थित उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रोहिणी ताई येवलकर, गजानन पाटील, माजी आमदार अरुण पाटील, संतोष चौधरी, दिलीप सोनवणे, संजय दादा गरुड, महिला अध्यक्ष वंदना चौधरी, एजाज भाई मलिक, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, अरविंद मानकरी, प्रवक्ते योगेश देसले, संतोष चव्हाण, जयवंतराव पाटील . अध्यक्ष पि.टी.सी., यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन संजय नाना वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी, स्थानिक व्यवस्थापन समिती खलील देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन मान्यवरांचा सत्कार केला. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ . सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले यावेळी सर्वसंचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.