खडकदेवळा हायस्कूल मध्ये गणवेश वाटप

खडकदेवळा हायस्कूल मध्ये गणवेश वाटप

पाचोरा –
तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. आर. सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून 35 मुलं व 35 मुली असे मिळून एकूण 70 विद्यार्थ्यांना गणवेश दिले.

शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री प्रमोद गरुड सर गणवेश वाटपाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय जीवनातील शिक्षणाच्या संधीचा सदुपयोग करून यशस्वी भविष्याकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येऊ शकते याबद्दल अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एन. पाटील यांनी केले. श्री एन. एन. पाटील व श्री वाय. बी. परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री एस टी घोडेस्वार यांनी केले. याप्रसंगी सकाळ सत्रातील श्री साळुंखे सर श्री स्वप्निल बागुल श्रीमती एस. जी. बाविस्कर श्रीमती एस. पी. राजपूत, शिक्षकेतर कर्मचारी सुनील गुजर आणि सागर राजपूत उपस्थित होते.