पै.राजेंद्र भोई यांच्या कार्याची दखल !!

पै.राजेंद्रभोई यांच्या कार्याची दखल

1st National Grappling Wrestling Championship 2021, NewDilhi येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक विजेते लोहारा, तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील रहिवासी पैलवान राजेंद्रभोई यांच्या दिल्लीवरील कामगिरीची दखल त्यांच्या सामाजिकपातळीवर लोहारा येथे मिरगल मच्छीमार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून घेण्यात आली. मिरगल मच्छीमार सहकारी संस्थेने पैलवान राजेंद्रभोई यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मिरगल मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री दशरथ भिल, व्हाईस चेअरमन श्री ज्ञानेश्वर कोळी, सचिव श्री मोहनभोई, तसेच मच्छीमार सोसायटीचे सदस्य श्री भगवानभोई, श्री सुरेशभिल, श्री पुनाजी भिल, श्री भास्करभोई, श्री आत्माराम कोळी, श्री देवरामभोई, श्री ईश्वरभोई श्री संजयकोळी, श्री अतुलकोळी इत्यादी घटक उपस्थित होता यावेळी भविष्यातील कार्यासाठी पैलवान राजेंद्रभोई यांना सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.