_राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालय कोळगावच्या ओमकार कराळे यांस सुवर्ण तसेच स्वराज चौधरीस रौप्य पदक…!!!!_
भडगाव (प्रतिनिधी) –
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव ता-भडगाव येथील इयत्ता अकरावीचे विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे पहिलवान ओमकार संतोष कराळे याने सुवर्ण तर स्वराज प्रल्हाद चौधरी याने रौप्य पदक प्राप्त केले आहे.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे छत्रसाल स्टेडियम,मॉडेल टाऊन,दिल्ली येथे 22 ते 27 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय ग्रीकरोमन कुस्ती स्पर्धेत 17 वर्षाआतील 55 किलो वजनी गटात ओमकार कराळे याने प्रथम स्थान मिळवत करीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे तसेच स्वराज चौधरी याने याच कुस्ती प्रकारात 60 किलो वजनी गटात द्वितीय स्थान प्राप्त करत रौप्य पदक प्राप्त केले आहे.
स्वराज याची खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
विशेष बाब म्हणजे म्हणजे काही दिवसांपूर्वी इंफाळ, मणिपूर येथे पार पडलेल्या 68 वी राष्ट्रीय वेट लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत स्वराज चौधरी याची लहान बहिण कु. साध्वी प्रल्हाद चौधरी हिने 17 वर्षाआतील स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
ओमकार व स्वराज यांचा सध्या साई खेळ प्राधिकरण, कांदिवली, मुंबई येथे सराव चालू असून त्यांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी डी.वाय.एस.पी.विजय चौधरी,रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, संतोष कराळे, प्रल्हाद चौधरी,संजय कराळे,सयाजी मदने, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.रघुनाथ पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
ओमकार आणि स्वराजच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक जगदीश पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील, पर्यवेक्षक आर.एस.कुंभार यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.