शिंदे इंटरनॅशनल स्कूल तर्फे दीपावलीच्या अनोख्या शुभेच्छा
पाचोरा
येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित, शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा , तर्फे दिवाळी विषयक माहितीपूर्ण चित्रफित प्रदर्शित करून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या चित्रफिती चे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या प्रेरणेतून प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन यंदा दीपावलीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतात विविध धर्मीयांचे सण-उत्सव होत असले तरी हिंदू धर्मियांचा दिवाळी सण सर्वच भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सहा दिवस चालणाऱ्या या दिवाळी सणात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज आदी उत्सवांचा सहभाग असतो. या सर्वच उत्सवांची थोडक्यात एकत्र मांडणी करून एक माहितीपूर्ण चित्रफीत शिंदे इंटरनॅशनल स्कूल तर्फे प्रदर्शित करण्यात आली आहे.
संस्थेचे सहसचिव शिवाजी शिंदे लिखित या चित्रफिती मध्ये संस्था अध्यक्ष व परिवार, तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे, प्राचार्य, महिला शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. दिवाळी सणाचे धार्मिक महत्व,पावित्र्य, कौटुंबिक आनंदोत्सव या सर्व बाबीचे सादरीकरण अलगद टिपण्यात आले आहे. अल्टिमेट स्टुडिओ चे संचालक अमोल पाटील यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. ही चित्रफित सर्व विद्यार्थी पालक यांच्या पसंतीला उतरली असून या चित्रफिती बाबत शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























