नांद्रा येथे स्व.कै.बापुराव बाविस्कर यांच्या स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबीर व शिवचरित्र व्याख्यान संपन्न

नांद्रा येथे स्व.कै.बापुराव बाविस्कर यांच्या स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबीर व शिवचरित्र व्याख्यान संपन्न

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहार)- येथे दि.३ नोव्हेंबर वार बुधवार रोजी माजी सरपंच व माजी प.सदस्य व परिसरात अष्टषैलू मितभाषीक व खान्देशी बोली भाषा अहिराणीवर पकड असणारे नटसम्राट जेष्ठ शिवसैनिक स्व.बापूराव नामदेव बाविस्कर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शिवस्मारक गृप ,राजे संभाजी मिञ मंडळ,बाविस्कर परिवार व गावातील तरुणमीञ मंडळी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजक संयोजक वाल्मीक बापुराव बाविस्कर यांनी सकाळी ९.वा.रक्तदान शिबिर ठेवले होते या शिबीराला गावातील ३२ तरुणांनी रक्तदान केले तर राञी ८.वा तरूणांना गावातील नवनिर्माण झालेले शक्तीपीठ शिवस्मारक यांच्या विषयी शिवचरीञ ज्ञात होऊन तरुणांना त्यांच्या पासून प्रेरणा व ऊर्जा मिळावी या उदात्त हेतूने व्याख्यान देण्यासाठी पन्हाळा ता.कोल्हापुर येथून श्रीकृष्णा पाटिल गुरुजी हे आले होते.याप्रसंगी कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून डाॕ.भूषणदादा मगर हे होते तर कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती मध्ये नगरसेवक विकास पाटिल सर,एस.ए.पाटिलसर,नितिनदादा तावडे व सरपंच ,उपरपंच,ग्रा.प.कमिटी सदस्य,वि.वि.का.सो.सदस्य, पोलिस पाटिल ,महादेव मंदिर संस्थान सदस्य व गावातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर ,जेष्ठ शिवसैनिक,तरुणमिञ उपस्थित होते .कार्यक्रम ला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होते कार्यक्रमामाचे सूञसंचालन एस.ए.पाटिलसर , प्रास्ताविक वाल्मीक बाविस्कर व आभार प्रदर्शन विनोदआप्पा बाविस्कर यांनी केले कार्यक्रम यश्वीतेसाठी शिवस्मारक गृप, राजे संभाजी महाराज मिञ मंडळी ,बाविस्कर मिञ परिवार व ग्रामस्थ यांनी परीश्रम घेतले.