नांद्रा येथे शेतात फवारणी करताना शेतकऱ्याला विष बाधा होऊन दूर्दवी मृत्यू

नांद्रा येथे शेतात फवारणी करताना शेतकऱ्याला विष बाधा होऊन दूर्दवी मृत्यू

नांद्रा ता.पाचोरा(वार्ताहार)-येथे शेतकरी लक्ष्मण दामू सूर्यवंशी वय 63 यांचे आज दि.27 आॕगस्ट रोजी दु.3.वा आपल्या शेतात कपासीवर पडलेल्या विविध रोगराई वर अति उन्हात विषारी औषध फवारणी करताना औषधीचा विषबाधा होऊन आकस्मिक मृत्यू झाला.निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी प्रमाणेच यावर्षी ही अत्यल्प पर्जन्यमान व त्यामुळे अजून ही उन्हाची तिव्रता कायम असल्याने व कपाशीवर लाल्या व थ्रीस सारखे भयंकर बोंडअळी पाडणारे आजार त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज करुन शेती करणे जीकरीचे झाले असताना त्यामध्ये महागडे रासायनिक खते व महागडे फवारणी औषधे मारुन शेतकरी आपल्या पिकांची पुर्ण मशागत करुन जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल या विवंचनेत असतो त्यासाठी तो स्वता पाठीवर पंप घेऊन सुर्य उगवताच व सूर्यमावळे पर्यंत आपल्या शेतालाच देवता मानून काबाडकष्ट करत असतो.त्यामध्ये निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकरी इतका खर्च करून ही अपयशी ठरतो व उत्पन्न घटते अशाच दोन पैसे वाचावे म्हणून स्वत पाठीवर पंप घेऊन फवारणी करताना लक्ष्मणआबा यांना उन्हात चक्कर येऊन व विषबाधा होऊन गावातील एक चांगले व सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व लक्ष्मणआबा यांच्यावर काळाने घाला घातला.या आकस्मिक व दुर्दैवी निधनामुळे नांद्रा परिसरात शेतकरीवर्ग,ग्रामस्थ यांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे.