गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय तसेच राज्य क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा सन्मान सोहळा संपन्न…!!!
भडगाव (क्रीडा प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता.भडगाव येथील विविध क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा गौरव स्व.सौ.साधनाताई पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथीदिनी करण्यात आला.
आपल्या कौशल्याने राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयास पदक मिळवून देणाऱ्या व नाव लौकिक करणाऱ्या ओमकार कराळे,स्वराज चौधरी,तनु पाटील,गौतम पाटील,अर्णव खैरणार,जयदीप सोनवणे,यश पाटील,गायत्री गोसावी,प्रेरणा पाटील,सुनिल फासगे,गणेश महाजन,राकेश भिल्ल,विवेक शिंदे,ओम बोरसे,भावेश मच्छिंद्र पाटील,रोशन पाटील,भावेश जितेंद्र पाटील आदि खेळाडूंना संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,व्हा.चेअरमन डॉ.पुनमताई पाटील,ज्येष्ठ विचारवंत हेरंब कुलकर्णी, प्रा.सुनिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले,यावेळी खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार,पर्यवेक्षिका सिमा शिसोदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
पदक प्राप्त खेळाडूंना प्रभारी कार्यवाहक रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बालू साळुंखे, राष्ट्रीय खो–खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

























