पाचोऱ्यात महाराष्ट्र वाणी युवा मंच नूतन कार्यकारिणी निवड

पाचोऱ्यात महाराष्ट्र वाणी युवा मंच नूतन कार्यकारिणी निवड

पाचोरा ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा: पाचोराची नुकतीच नविन कार्यकारिणी निवड खालीलप्रमाणे करण्यात आली असून श्री महेंद्र वसंत महालपुरे यांची अध्यक्षपदी, श्री योगेश रमेश शेंडे यांची उपाध्यक्षपदी, श्री विजय जगन्नाथ सोनजे यांची खजिनदारपदी, श्री अशोक काशिनाथ बागड यांची कार्याध्यक्ष पदी, श्री शरद बाळकृष्ण पाटे यांची तालुकाध्यक्षपदी, श्री प्रकाश मधुकर येवले यांची ज्येष्ठ संघटकपदी, प्रा श्री राजेंद्र जनार्दन चिंचोले सर यांची ज्येष्ठ सल्लागारपदी निवड करण्यात आली असून ज्येष्ठ मार्गदर्शकपदी प्रा श्री लक्ष्मण हरी सिनकर सर, श्री किरण गोपाळ अमृतकर, श्री संजय पुंजू शेंडे तसेच श्री प्रविण एकनाथ शेंडे यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यकारिणीत श्री संदीप बबन महालपुरे, श्री विशाल बाळकृष्ण ब्राम्हणकर, श्री गणेश प्रकाश सिनकर, श्री विवेक बापूराव ब्राम्हणकर यांची सदस्य या पदावर निवड करण्यात आली असून श्री रमेश रामदास महालपुरे यांची प्रसिद्धी प्रमुख या पदावर निवड करण्यात आली.
सदर कार्यकारिणी निवड महाराष्ट्र वाणी युवा मंचचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री ज्ञानेश्वर रघुनाथ कोतकर सर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
सर्व आदरणीय कार्यकारिणी मंडळाचे खुप खुप अभिनंदन.